spot_img
spot_img
spot_img

वाकी फाट्यावर ट्रकचालकाला अज्ञात वाहनाची धडक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चाकण-नाशिक महामार्गावरील वाकी फाटा येथील एचपी पेट्रोल पंपासमोर ट्रकचालकाला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. या अपघातात पारसनाथ हरगेन यादव (वय ४२) हे गंभीर जखमी झाले.

यादव यांनी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून DEF (AdBlue) भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात असताना नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. यादव यांच्या उजव्या पायाचे व डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर, डाव्या पायाला दुखापत झाली असून तोंडाला जबर मार लागल्याने चार दात पडले व ओठाला १४ टाके पडले आहेत.

जखमी यादव यांना रुग्णवाहिकेने आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या वाहनाचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!