spot_img
spot_img
spot_img

देहूरोडमध्ये तरुणाकडून विनापरवाना तलवार जप्त; २४ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

देहूरोड परिसरातील किन्हई गावाच्या हद्दीत चिंचोली ते किन्हई मार्गालगत विनापरवाना लोखंडी तलवार बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून, देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यासह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास किन्हई गावाच्या हद्दीत चिंचोली ते किन्हई जाणाऱ्या रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी सोनू उर्फ आशितोष दिंगंबर एकलारे (वय २४, रा. विघ्नहर्ता सोसायटी, देहुगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा संशयास्पदरीत्या आढळून आला.

पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या ताब्यात लोखंडी तलवार आढळून आली. सदर तलवार बाळगण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना ती अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तलवार जप्त करून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी-चिंचवड येथील पोलीस शिपाई अमोल श्रीकांत वेताळ (वय ३६) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ नुसार भारतीय शस्त्र कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.५३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपीकडे तलवार नेमकी कोणत्या उद्देशाने होती, तसेच त्यामागे अन्य काही कारण अथवा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

या कारवाईत मपोउपनि माने तसेच पोलीस हवालदार खेडकर आणि इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!