शबनम न्यूज | प्रतिनिधी
कै. श्री. फकीरभाई पानसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एल.एस.एफ.पी.ई.एफ. लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व जीवनावश्यक वस्तू वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, दि. 7 सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १0 ते दुपारी १ वाजेपर्यंत मातृसेवा सेवाभावी संस्था, पांडुरंग कॉम्प्लेक्सजवळ, पंचतारा नगर, बिजलीनगर, गंगानगर, आकुर्डी, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये नागरिकांची मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत होमिओपॅथिक वैद्यकीय सल्ला व औषधे, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आली.
आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर, बेडशीट, उशीचे अभ्रे आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले
कै. श्री. फकीरभाई पानसरे यांच्या सामाजिक कार्याला अभिवादन म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला.
या उपक्रमाचे आयोजन श्री. निहाल पानसरे (संचालक), डॉ. सौ. झोया पानसरे (संचालक) आणि डॉ. सोनाली मोहरिल (प्राचार्या), एल.एस.एफ.पी.ई.एफ. लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.





Total Users : 224186