पुणे कॅम्प परिसरात धार्मिक वातावरण; विविध आखाड्यांचे भगत निशाण घेऊन मिरवणुकीत सहभागी
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भगवान श्री वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा आणि भव्य बागड मिरवणूक यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पुणे कॅम्प परिसरातील पुलगेट पोलीस चौकीसमोरील भगवान जहारवीर गोगादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
भगवान गोगादेव यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे कॅम्प परिसरातील विविध भागांतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील विविध आखाड्यांचे भगत पारंपरिक निशाण घेऊन मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले. निशाणांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात आणि जयघोषाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व निशाणांचे श्रीफळ आणि फुलांच्या माळा अर्पण करून स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भगवान श्री वीर गोगादेव यांचे दर्शन घेतले. उत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
जन्मोत्सव सोहळ्याला उत्सव समितीचे अध्यक्ष तथा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य करण मकवाणी, उत्सव समारंभ अध्यक्ष डॉ. अनुपम बेगी, पुणे शहर मेहतर वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष रवी परदेशी, माजी नगरसेवक सुधीर जानज्योत, कविराज संगेलिया, ॲड. श्याम चव्हाण, अर्जुन सोळंकी, शैलेंद्र जाधव, चेतन जेधे, कनव चव्हाण, मनोज पटेलिया, चंद्रकांत चव्हाण, मनू कागडा, योगेश चव्हाण, महेंद्र चव्हाण, कन्हैया संगेलिया, दीपक निनारिया, अशोक मेमजादे, सिद्धार्थ सारवान, रामलाल भगत, नितीन चव्हाण, मेघराज पवार, बिल्लू सारवान, सुनील पिवाल यांच्यासह समाजातील विविध मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवामुळे पुणे कॅम्प परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक, समाजबांधव, आखाड्यांचे भगत आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




Total Users : 224186