spot_img
spot_img
spot_img

मनसे दहीहंडी उत्सव जल्लोषात संपन्न; चिमुकली स्वराधी ओव्हाळने फोडली दहीहंडी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, युवा प्रतिष्ठान तसेच मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले व माजी नगरसेविका अश्विनी चिखले-मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली यमुनानगर येथील सद्गुरू उद्यानात भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला.

उत्सवात रुपीनगर येथील वक्रतुंड ढोल पथकाने सुमारे एक तास ढोल-ताशांचा गजर करत वातावरणात उत्साह निर्माण केला. चेंबूर येथील शिवशक्ती गोविंदा मित्र मंडळाने मानव मनोरे रचून दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. परिसरातील हजारो नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला.

सिनेअभिनेते रमेश परदेशी आणि अभिनेत्री किरण नाईकडे-पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावत गोविंदा पथकांना व नागरिकांना प्रोत्साहन दिले. तसेच पोलीस मित्र संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले.

दरम्यान, गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्यास उशीर झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून हंडी खाली घेण्यात आली. त्यानंतर प्रभागातील कु. स्वराधी ओव्हाळ या चिमुकलीला स्थानिक युवकांनी खांद्यावर घेत दहीहंडी फोडण्याचा मान दिला. मनसेतर्फे स्वराधीला प्रथम पारितोषिक म्हणून रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन मनसे उपविभाग अध्यक्ष स्वप्निल महांगरे, शाखाध्यक्ष रोहित दादा काळभोर, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष गणेश राजगुरू, उद्योजक पवन मेउरकर, मनोज दादा लांडगे, निलेश पवार तसेच युवा कार्यकर्त्यांनी केले.

कार्यक्रमाला युवा नेते इरफान भाई सय्यद, काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार यांच्यासह प्रभागातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!