spot_img
spot_img
spot_img

कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यावर नगरसेवक सागर कोकणेंची तातडीने बैठक!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 प्रभागातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत स्थानिक नगरसेवक सागर कोकणे यांनी संबंधित अधिकारी व सहकारी नगरसेवकांसोबत बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली.

या बैठकीमध्ये प्रभागातील ज्या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणांची परिस्थिती, पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी तसेच नागरिकांना पुरेशा दाबाने आणि नियमित पाणी मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पाणी ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असून, कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या केवळ तात्पुरती न सोडवता पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर करून प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत आणि पुरेशा दाबाने करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

‘नागरिकांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,’ अशी भूमिका नगरसेवक सागर कोकणे यांनी व्यक्त केली.

या बैठकीस सहकारी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविताताई खुळे, नगरसेविका अर्चनाताई तापकीर, युवा नेते विनोद तापकीर तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी समीक्षा मालपुरे आणि शेखर साठे उपस्थित होते.

नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने बैठक घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यास सुरुवात केल्याने संबंधित परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!