spot_img
spot_img
spot_img

भोसे येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघे जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

शिक्रापूर-चाकण रोडवरील भोसे येथील माऊली ग्रेन सर्व्हिस अँड ट्रान्सपोर्टसमोर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांना दुखापत झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. रवींद्र तुकाराम कालेकर (वय ३८, रा. पिंपळवंडी, कालेकरवाडी, ता. जुन्नर) हे त्यांचा मित्र आनंद चंद्रकांत करडक यांच्यासह मोटारसायकलवरून शिक्रापूर-चाकण मार्गाने जात होते.

भोसे येथील माऊली ग्रेन सर्व्हिस अँड ट्रान्सपोर्टसमोर त्यांच्या दुचाकीसमोर अज्ञात वाहनचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिली. या अपघातात कालेकर यांना गंभीर तसेच किरकोळ दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात तुटफूट होऊन नुकसान झाले.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!