spot_img
spot_img
spot_img

आमदार सुनील शेळके यांनी ठाकर व धनगर समाजातील बांधवांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

डोंगर भागात वाडेवस्त्यांवर राहणाऱ्या ठाकर व धनगर समाजातील बांधवांसोबत मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आनंदाची दिवाळी साजरी करत सर्व समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप केले. लोणावळा शहरालगत असलेल्या धनगरवस्ती पांगोळी येथील संत बाळूमामा मंदिराच्या परिसरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत बाळूमामाचे दर्शन घेत व त्यांची सांज आरती करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आपल्या हक्काच्या माणसांसोबत सणाचा आनंद वाटण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात जी तृप्ती मिळते, ती अमूल्य आहे अशी भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले महिला भगिनींच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना चांगल्या चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असेल. कोणताही आजार असो, कोणतेही उपचार घ्यायचे असोत, मला एक फोन करा, चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर उपचार केले जातील. मला शंभर टक्के वैद्यकीय सेवा देता आली नाही तरी किमान 90% सेवा देण्याचा मी प्रयत्न करेल असा विश्वास व आश्वासन त्यांनी या दिवाळी सणाच्या व भाऊबीजेच्या निमित्त मावळ तालुक्यातील तमाम आता भगिनींना दिले आहे.


महाराष्ट्र मध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळ पडला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुरू आहे. मावळ तालुक्यातील नागरिकांना वर्षभर पुरेल एवढे पाणी त्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करत आरक्षित करून ठेवले आहे. दिवाळी सणाच्या निमित्त डोंगर भागात व वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवण्यासाठी त्यांनी आनंदाची दिवाळी हा उपक्रम हाती घेत थेट या नागरिकांमध्ये जाऊन दिवाळी सण साजरा करत आहेत. वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचा फराळ, जेवण तसेच कपडे याचे वाटप केले जात आहे.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या जीवनामध्ये व आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश पाडण्याचे काम आनंदाची दिवाळी या उपक्रमातून केले जात आहे. आमदार सुनील शेळके युवा मंचच्या वतीने सकाळपासूनच या परिसरामध्ये या कार्यक्रमाची आखणी व तयारी सुरू होती. आमदार सुनील शेळके यांच्या स्वागतासाठी ठाकर व धनगर समाजातील महिला मोठ्या उत्साहात उपस्थित होते. लहान मुले व वयस्कर नागरिक देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते. या भागातील रस्त्याची समस्या सोडवण्याचे महत्त्वाचे काम आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून झाले आहे. लवकरच हा तुंगार्ली धरण परिसरातील रस्ता हा नव्याने तयार केला जाणार आहे. मागील अनेक वर्षापासून ची या भागातील नागरिकांची मागणी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या वनविभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे.

या कार्यक्रमासाठी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, नगरसेवक धनंजय काळोखे, निखिल कवीश्वर, वरसोली ग्रामपंचायतचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच नारायण कुटे, माजी सरपंच बबन खरात, उद्योजक बलदेव सिंग जग्गी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!