spot_img
spot_img
spot_img

मोशी येथे मर्सिडीज बेंझ कारला आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शिव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर MH14 FU 0007 क्रमांकाच्या मर्सिडीज बेंझ कारच्या इंजिन व बोनेटला अचानक आग लागल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली उपअग्निशमन केंद्रातील जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वाहनाच्या इंजिन व बोनेटच्या भागात आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी होज रीलच्या साहाय्याने पाण्याचा फवारा मारून आग पूर्णपणे विझवली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी कोणताही धोका नसल्याची खात्री केल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावरून रवाना झाले.

आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!