पिंपरी: आत्मनिर्भर युवा पिढी हेच विकसित राष्ट्राचे बलस्थान आहे त्यामुळे युवकांनी क्रमिक अभ्यासक्रमासोबतच पदवीधर होतानाच कौशल्य विकास प्रशिक्षणाचाही अंगीकार करावा असे मत वनाज इंजिनियर्स लिमिटेड चे मुख्य कार्मिक अधिकारी अतुल बोरगावकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त यशस्वी संस्थेच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर यशोगाथा विशेषांकाचे प्रकाशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

आजच्या काळात कौशल्याचे स्वातंत्र्य आत्मनिर्भरतेचे स्वातंत्र्य शाश्वत स्वातंत्र्य बनले आहे त्यामुळे युवकांनी आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक नैपुण्य कसे प्राप्त करता येईल असे मत बोरगावकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आयआयएमएस च्या विद्यार्थ्यांच्या टी-शर्ट पेंटिंग स्पर्धेत विजेते ठरलेल्या साक्षी भापकर, प्रतीक्षा धोंडगे आणि अस्मित पंडित विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जे जेजेराव बाईलके व गणेश पन्हाळे या यशस्वी संस्थेतील कर्मचाऱ्यांचा विशेष प्रमाणपत्र व धनादेश प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे, यशस्वी संस्थेचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर,ऑपरेशन विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांच्यासह अध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पवन शर्मा, स्वप्निल देशमुख आदींनी विशेष सहकार्य केले.





Total Users : 213779