पिंपरी-चिंचवड : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन पिंपरी-चिंचवड शहरात आज मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. थेरगाव परिसरातही स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. भाजपच्या नगरसेविका तथा ‘ग’ प्रभागाच्या प्रभाग अध्यक्षा मनीषाताई प्रमोद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

‘ग’ प्रभाग कार्यालय, पुरंदर येथे मनीषाताई प्रमोद पवार यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ध्वजगीत आणि राष्ट्रभक्तीपर घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर नगरसेविका मनीषाताई प्रमोद पवार यांच्या हस्ते थेरगाव येथील यशवंतराव माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला.

तसेच थेरगावातील रावजी बारणे प्रशाला येथेही मनीषाताई प्रमोद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी ओळखण्याचा दिवस आहे, असा संदेश यावेळी मनीषाताई प्रमोद पवार यांनी दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांना आपल्या जीवनात प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दिवसभरात थेरगाव परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मनीषाताई प्रमोद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरवासीयांसह आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नगरसेविका मनीषाताई प्रमोद पवार यांच्या सक्रिय सहभागामुळे थेरगाव परिसरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वाढला असून, राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश या विविध कार्यक्रमांतून देण्यात आला.





Total Users : 213710