शबनम न्यूज | प्रतिनिधी
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य प्राप्त कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यापीठे, आस्थापना यांच्याशी सामंजस्य करार केले आहेत. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चा, परिसंवाद, शैक्षणिक दौरे यामध्ये सहभागी होता येते. या करार अंतर्गत क्रोएशिया, इजिप्त, केनिया आणि सोमालिया च्या दूतावास मधील शिष्टमंडळाने पीसीईटी कॅम्पस मध्ये आणि रावेत येथील एसबी पाटील पब्लिक स्कूल मध्ये केलेला शैक्षणिक संवाद दौरा महत्त्वपूर्ण आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली.
पीसीईटीच्या कॅम्पस मध्ये क्रोएशिया, इजिप्त, केनिया आणि सोमालिया च्या दूतावास मधील शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. या शिष्टमंडळात क्रोएशिया प्रजासत्ताक दूतावासचे उप प्रमुख ब्रानिमीर फरकास, इजिप्त दूतावासचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध विभाग प्रमुख डॉ. आयत साद अहमद इस्माईल, केनिया दूतावासचे द्वितीय सचिव ॲन कासिचाना या, सोमालिया दूतावास चे वाणिज्य सहकारी अब्दिरिसाक सेद नूर, इजिप्त दूतावासचे सचिव सेविका लामा यांचा समावेश होता त्यांचे स्वागत पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई केले.
यावेळी पीसीईटी च्या युरोपियन स्टडीज केंद्र प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, पीसीसीओई आतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, पीसीयू चे टाटा मोटर्स डिप्लोमा प्रोग्राम प्रमुख डॉ. उमेश पोतदार, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल इंडिया चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव गुप्ता आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले की, या भेटीमुळे पीसीईटीची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारी वाढवण्यासाठी मदत होईल. आंतरराष्ट्रीय दूरदृष्टी या कॅम्पस मध्ये रुजवली जात आहे.
पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले की, शैक्षणिक उपक्रम आदान प्रदान, संशोधन सहकार्य, विद्यार्थी गतिशीलता आणि संस्थात्मक भागीदारी साठी या संवाद दौऱ्यातून विविध संधी उपलब्ध होतील.
पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांनी सांगितले की, या दौऱ्यातून शाश्वत जागतिक युती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा संवाद दौऱ्यात सहभाग घेऊन संस्थेची शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारी साठीचे आश्वासक मार्ग तयार होतील.
डॉ. उमेश पोतदार यांनी टाटा मोटर्सच्या सहकार्याने विकसित केलेला विद्यापीठाचा अनोखा उद्योग एकात्मिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
डॉ. गौरव गुप्ता यांनी सांगितले की, जीटीटीसीआय हे सरकारे, राजनयिक दूतावास, शिक्षण संस्था, उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्था यांना जोडून आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यात मदत करते. ज्यामुळे जागतिक भागीदारी आणि सहयोगाच्या संधींना चालना मिळते.



