spot_img
spot_img
spot_img
spot_img

मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांचा वाढदिवस साधेपणाने ; जल्लोष टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत नऊ सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारच्या जल्लोषात किंवा उत्सवी वातावरणात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी वाढदिवसानिमित्त नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून मिळणारे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद हे सार्वजनिक जीवनातील मोठे बळ असल्याचे सांगत, यंदा मात्र मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

याबाबत आवाहन करताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “मोशी दुर्घटनेत आपल्या नऊ सहकाऱ्यांचे दुःखद निधन झाले. या कुटुंबांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा जल्लोष, स्वागत समारंभ किंवा उत्सवी आयोजन करू नये, ही माझी सर्व कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना नम्र विनंती आहे.”

वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ, बॅनर, होर्डिंग, फटाके किंवा स्वागत समारंभ आयोजित न करता त्याऐवजी रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर, दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप तसेच इतर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

“गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी केलेले सामाजिक कार्य हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. दिवंगत सहकाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करत समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ करूया,” असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी होणारा खर्च समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरावा आणि या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!