शबनम न्यूज | प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यालय, शिशुविहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदरबाई भानसिंग हुजा गुरुगोविंद इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी येथे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.नर्सरी ते इ. 10 पर्यंचे सर्व विध्यार्थी, पालक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
संस्थेचे उपाध्यक्ष उद्योजक मा. सतीश साठे देशमुख व त्यांच्या सुविद्ध पत्नी सौ.शिला साठे, संस्थेचे कार्याध्यक्ष व विद्यमान सत्तारूढ पक्षनेते मा. प्रशांत शितोळे, खजिनदार मा. रामभाऊ खोडदे, सचिव मा. तुळशीराम नवले, सदस्य मा. प्रकाश ढोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. सांगवी परिसरातील प्रसिद्ध संबळ वादक मा. गणेश पाचंगे यांच्या संबळ बँड च्या निनादात पालखीचे प्रस्थान झाले.या प्रबोधन वारीत विध्यार्थ्यानी विठ्ठल, रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मीराबाई, संत जनाबाई,वासुदेव, छत्रपती संभाजी, मावळे ,इत्यादी वेशभूषा केल्या होत्या तसेच इतर विद्यार्थ्यांनी धोतर, कुर्ता, तुळशीची माळ, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात पताका घेऊन वारकऱ्याचे रूप साकारले, तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी, डोक्यावर तुळशी वृंदावन व हंडी घेऊन सहभाग नोंदवला.
या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून मतदार नोंदणी अभियान (SIR) चा सामाजिक संदेश देण्यात आला. प्रत्येक मतदाराने आपला EF फॉर्म भरला पाहिजे नाहीतर आपले नाव मतदार यादीतून काढले जाईल, सर्वांनी मतदान पुनर्नरीक्षण फॉर्म भरला पाहिजे यांची जनजागृती करण्यात आली. सांगावीतील गजानन महाराज मंदिर परिसरात सामाजिक कार्यकर्ते मा. विजय जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आली व विद्यार्थ्यांनी फुगड्या, रिंगण आणि भक्तीगीतांवर ताल धरत वारीचा प्रत्यक्ष आनंद लुटला.
वारीत समस्थ सांगावीचे गावकरी, ज्येष्ठ नागरिक संघ, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने, शीतल शितोळे, शोभा वरठी, संगिता सूर्यवंशी, सुनिता टेकवडे, सीमा पाटील, दत्तात्रय जगताप, स्वप्नील महाराज कदम, हेमालता नवले, मनिषा लाड, चेतना शिंदे, श्रद्धा जाधव,वर्षाराणी माने,संदीप डावरे, प्रतिमा दुबळे,भारती घोरपडे,निर्मला भोईटे,निता ढमाले,अश्विनी करे, शीतल गरसुंड,अर्चना औंधकर, कविता नायडू,पुजा ढमढेरे,वर्षा शहाणे, सुरेखा ढोणे,उषा ठाकर,रेश्मा आव्हाड, स्नेहल खोंड,रिंकू चाळेकर, सुचित्रा भोसले
भावना पाटील,सायली जगताप
छाया नलावडे, स्नेहा मोहिते, कुसुम ढमाले,मनीषा गायकवाड, चेतना इंगळे, कविता म्हस्के, इ. सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि पालकांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.


