spot_img
spot_img
spot_img

सायबर टोळीसाठी बँक खाते वापरल्याचा आरोप; सात नागरिकांची ₹२.७१ लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटित टोळीसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात देशातील सात नागरिकांची तब्बल ₹२ लाख ७१ हजार ४२९.७० रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रविणकुमार याने द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेतील स्वतःचे खाते उघडून ते सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी संघटित सायबर टोळीला वापरण्यास दिले. या खात्यावर ₹२,७१,४२९.७० इतके आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळून आले असून, देशातील सात तक्रारदारांची फसवणुकीची रक्कम या खात्यात जमा झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!