spot_img
spot_img
spot_img

रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये झाड कोसळून नागरिक गंभीर जखमी ; नाना काटे यांच्याकडून तात्काळ मदत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील सौदागर हॉटेलसमोर मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून सोसायटीतील रहिवासी श्री. एस. एन. गुडाळे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नाना काटे यांनी पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणेशी त्वरित संपर्क साधत आपल्या जनसंपर्क कार्यालयातील टीम तसेच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना केली. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून जखमी श्री. गुडाळे यांना सुरक्षितपणे बाहेर काढून जीवनज्योती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक तपासणीनुसार त्यांच्या मणक्याला दुखापत झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण मदतकार्यात पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील सहकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे नाना काटे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी नाना काटे यांनी जखमी एस. एन. गुडाळे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठी झाडे, जीर्ण भिंती आणि धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर ठेवून सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!