spot_img
spot_img
spot_img

पेट्रोल पंपावर २५ लाखांचा अपहार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

मावळ तालुक्यातील आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावर तब्बल २५ लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला असून तिघांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय रमेश बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी धर्मेंद्र रामाश्रय पांडे, विजय बाबुराव त्रिभुवन आणि चैतन्य विठ्ठल चांदेकर यांनी पेट्रोल पंपावरील व्यवहारांचा गैरफायदा घेत विश्वास संपादन केला. त्यानंतर पेट्रोल व डिझेल विक्रीतून जमा झालेली रक्कम स्वतःच्या तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये यूपीआयद्वारे वळवून सुमारे २५ लाख रुपयांचा अपहार केला.

तसेच स्टॉक रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून आर्थिक गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!