spot_img
spot_img
spot_img

मुंबईत शाळेच्या व्हॅनवर विशाल पिंपळाचे झाड कोसळले; ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबईतील चेंबूर परिसरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर अचानक एक विशाल पिंपळाचे झाड कोसळल्याने हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर परिसरातून शाळेकडे जात असताना चालत्या स्कूल व्हॅनवर रस्त्यालगत असलेले मोठे पिंपळाचे झाड कोसळले. या घटनेत विहान श्रीवास्तव याचा जागीच मृत्यू झाला, तर व्हॅनमधील इतर अनेक विद्यार्थी जखमी झाले.

अपघातानंतर तातडीने अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवून जखमी विद्यार्थ्यांना जवळील जैन रुग्णालय आणि झेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. परिसरातील धोकादायक व कमकुवत झालेल्या झाडांबाबत तसेच झाडांच्या छाटणीसंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांनी वेळेत कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!