spot_img
spot_img
spot_img
spot_img

दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आज आपण जे वैभवशाली शहर पाहत आहोत, त्या शहराच्या विकासाचे स्वप्न माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून साकारले आहे.त्यांच्या कार्याची आठवण म्हणून महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे नाव दापोडी ते निगडी अशा रस्त्यास देण्यात आले असून त्यामुळे पुढील पिढ्यांना त्यांच्या व्यापक कार्याची ओळख होईल असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या नुकत्याच झालेल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करत, दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे दापोडी येथील नामकरण फलकाचे अनावरण पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहर सुधार समितीचे सभापती संजय काटे,नगरसदस्य ॲड.नितीन लांडगे, राजू बनसोडे, नगरसदस्या माई काटे, प्रतीक्षा जवळकर,श्रुती वाकडकर,ज्येष्ठ इतिहासकार डॉ. राजा दीक्षित,सह शहर अभियंता मनोज सेठीया,बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय काशिद,उप अभियंता संतोष कुदळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच डॉ. सीमा काळभोर तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाला बोलताना महापौर रवि लांडगे यांनी “अण्णासाहेबांकडे नगराध्यक्ष आणि आमदार पदाची जबाबदारी होती. हडपसरवरून पिंपरी-चिंचवड आणि तिथून थेट मुंबई आणि परत हडपसर असा खडतर प्रवास अनेकदा करून अतिशय कष्टातून त्यांनी या शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी त्यांनी मुख्य १०० मीटर रुंद रस्त्यांचे केलेले नियोजन आणि औद्योगिक क्षेत्राचे केलेले नियोजन आज या शहराचा पाया ठरले आहे,” असे महापौर लांडगे यांनी सांगितले. तर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी एका कार्यक्रमात नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचा उल्लेख करत अभिवादन शहरातील मुख्य रस्त्यास त्यांचे नाव देण्याची संकल्पना मांडली होती.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!