spot_img
spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठ आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते तसेच विविध लोकप्रतिनिधी, संत पिठाचे संचालक, प्राध्यापक, शिक्षकवृंद आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत विविध राज्यांतील तसेच परदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. गुणवंत स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

संगीत कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!