पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
लोककल्याणकारी राजे, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि शिक्षण प्रसारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे चिंचवड येथील केएसबी चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. दुर्गा भोर यांनी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करताना सांगितले की, “शिक्षण, सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.”
या कार्यक्रमाला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभयदादा भोर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जयश्रीताई साळुंखे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख रईसा ताई पठाण, युवती अध्यक्षा अवंतिका भोर, सचिव माही शेख, पिंपरी-चिंचवड युवा अध्यक्ष आकाश बनसोडे, कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अमोल चव्हाण व निरंजन मनवर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पारसे, राजाराम आयवळे आणि दिलीप गुलिग यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून शाहू महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प केला.


