spot_img
spot_img
spot_img

दक्षिण चाकण पोलिसांची कारवाई; 414 ग्रॅम गांजासह एकाला अटक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

दक्षिण चाकण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत 414 ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 20 हजार 700 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून 2026 रोजी रात्री 10.32 वाजण्याच्या सुमारास मौजे मुटकेवाडी (ता. खेड) येथील मच्छी मार्केटच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी अंकित शांतीराम भगत (वय 29) याच्या ताब्यातील पिशवीतून 414 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा विक्रीसाठी गांजा बाळगत असल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ‘मुजावर भाई’ नावाच्या संशयिताचाही तपास सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!