spot_img
spot_img
spot_img

दापोडीत गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत; 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला दापोडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 51 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून 2026 रोजी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास श्रीरंग धोदाडे उड्डाणपुलाखाली, मुठा नदीलगतच्या मोकळ्या जागेत सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी यश उर्फ बबलू मारुती दिसले (वय 25, रा. बोपखेल) याच्या ताब्यात विनापरवाना एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!