पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरीतील गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर संत तुकारामनगर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांविरुद्ध कारवाई केली. यावेळी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास कामगार भवनच्या पाठीमागे, कन्नड गल्लीतील दुर्गामाता मंदिराजवळ काही व्यक्ती पैशांवर तीनपत्तीचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान ३ हजार ३० रुपये रोख रक्कम आणि तीनपत्तीच्या पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सैदप्पा नाटेकर, पांडुरंग सोनपाखरे, गंगाराम बनपट्टे, हनुमंत भिंगे, दिलीप थोरात आणि लक्ष्मण म्हेत्रे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास संत तुकारामनगर पोलिस करीत आहेत.




Total Users : 227506