पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
दिघी-आळंदी रस्त्यावरील मॅगझीन चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून तसेच अश्लील शब्दांचा वापर करत नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित महिलेने मॅगझीन चौक येथे फिर्यादी व इतर व्यक्तींना उद्देशून अश्लील हावभाव केले, अश्लील शब्दांचा उच्चार केला तसेच फिर्यादीच्या अंगावर हात फिरवून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले. तिच्या या कृत्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (पिटा) कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास दिघी पोलिस करीत आहेत.




Total Users : 227506