spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये भीषण अपघात; कंटेनरच्या चाकाखाली सापडलेल्या महिलेचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

चाकणमधील तळेगाव चौक परिसरात भरधाव कंटेनरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव चौक येथे कंटेनर (एमएच ४६ बीयू ०६७२) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवित एका महिलेला धडक दिली. धडकेनंतर महिलेच्या पाय व कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या.

घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि अॅम्ब्युलन्स चालक साईनाथ माकणे यांनी जखमी महिलेला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे नातेवाईकांनी महिलेची ओळख रोहिणी हिरासिंग दुरवेरा (रा. आंबेठाण, ता. खेड) अशी पटवून दिली. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी १५ जून रोजी पहाटे त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी कंटेनर चालक शंकर बळीराम जाधव (रा. रांजणगाव, ता. शिरूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तर चाकण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!