पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपळे गुरव येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या किरकोळ वादातून शेजाऱ्यांनी महिलेसह तिच्या भाच्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लक्ष्मीनगर लेन क्रमांक ३ येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादी आशा राजुकटराज (वय ५३) व त्यांचा भाचा आशिष यांना शिवीगाळ करून धमकावले. तसेच झालेल्या झटापटीत आशिष यांचा अंगठा मुरगळून फ्रॅक्चर झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवराज वाघमारे, त्यांची पत्नी पुष्पा वाघमारे आणि मुलगा महेश वाघमारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून सांगवी पोलिस पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 227519