spot_img
spot_img
spot_img

लवळे फाटा येथे सिगारेटवरून वाद; तरुणावर लोखंडी गजाने हल्ला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

लवळे फाटा परिसरात सिगारेट देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर गोविंद थापा (वय १९) हे १३ जून २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लवळे फाटा येथील त्यांच्या पानटपरीवर काम करत होते. त्यावेळी आरोपी अक्षय केळकर (वय अंदाजे २९) याने छोटी अॅडव्हान्स सिगारेट मागितली. फिर्यादीने ती उपलब्ध नसल्याचे सांगून मोठी अॅडव्हान्स सिगारेट दिली.

याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत लोखंडी गजाने त्यांच्या डाव्या हातावर फटका मारून दुखापत केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ११८(१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद १४ जून २०२६ रोजी पहाटे १.२७ वाजता करण्यात आली.

घटनेतील आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!