spot_img
spot_img
spot_img

मोशीत भरधाव कंटेनरची अॅक्टिव्हाला धडक; महिलेचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशी येथील इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंपाजवळ भरधाव कंटेनरने अॅक्टिव्हा दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू तर एका व्यक्तीचा हात गंभीर जखमी होऊन निकामी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग एकनाथ कुचेकर (वय ३५, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १० जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोशी येथील इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.

कंटेनर क्रमांक NL 01 AD 2845 वरील चालक सुंदर पंढरीनाथ गवळी (वय २६, रा. दिघी, पुणे) याने वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत अॅक्टिव्हा (MH 14 FB 9112) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सविता दयानंद कांबळे (वय ३०) यांचा मृत्यू झाला, तर दुसरे प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांचा उजवा हात निकामी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर कंटेनर चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!