spot_img
spot_img
spot_img

पिरंगुटमध्ये गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा; प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिरंगुट परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत १२ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नपूर्ती बिल्डिंग, लक्ष्मी रोड, पिरंगुट येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी विजय उत्तम रणदिवे (वय ४३) याच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व सुगंधी सुपारी असा एकूण १२ हजार ३१२ रुपयांचा माल आढळून आला.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग व इतर गंभीर आजार होऊ शकतात, याची जाणीव असतानाही आरोपी हा माल बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे. चौकशीदरम्यान हा माल पिरंगुट येथील एका व्यापाऱ्याकडून घेतल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपासही सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

पिरंगुट परिसरात गुटखा विक्रीचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे अवैध तंबाखू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!