spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये दुचाकीवरून अवैध दारू वाहतूक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

चिंचवड पोलिसांनी अवैध मद्य वाहतुकीविरोधात कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आर्किड इंटरनॅशनल स्कूलसमोर, लिंक रोड, चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी रामकृष्णन चतुर पासवान (वय ३३, रा. बळवंत दर्शन सोसायटी, चंद्रभागा कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) याच्याविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

तपासादरम्यान आरोपी हा सुमारे २ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधित मद्यसाठा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. हा माल एमएच १४ डीवाय ७०८९ क्रमांकाच्या जांभळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोपेडवरून नेला जात होता. पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपये किंमतीची दुचाकी तसेच मद्यसाठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी (प्रोव्हिबिशन) कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार धर्मनाथ किसन तोडकर यांनी दिली असून पुढील तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!