spot_img
spot_img
spot_img

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 16.76 लाखांची फसवणूक; नोब्रोकरवरील जाहिरातीचा गैरफायदा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशी येथील 3 बीएचके फ्लॅट विक्रीसाठी ऑनलाइन जाहिरात दिलेल्या नागरिकाला तब्बल 16 लाख 76 हजार 760 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तीन जणांसह विविध बँक खातेदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपला फ्लॅट विकण्यासाठी Nobroker.com आणि Housing.com या प्लॅटफॉर्मवर जाहिरात दिली होती. त्यानंतर आरोपींनी स्वतःला खरेदीदार व ब्रोकर असल्याचे भासवून संपर्क साधला. फ्लॅटचा व्यवहार करून देण्याच्या नावाखाली सुरुवातीला 1.71 लाख रुपये उकळले. त्यानंतर ओळखीचा वकील असल्याचे सांगत बनावट कागदपत्रे आणि व्यवहाराच्या आमिषाने विविध बँक खात्यांमध्ये आणखी 15.05 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले.

मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फोन व संदेशांना प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

ऑनलाइन मालमत्ता व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही रक्कम जमा करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची पडताळणी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!