spot_img
spot_img
spot_img

किरकोळ धडकेतून वाद विकोपाला; दगडाने हल्ला करून ज्येष्ठ नागरिक जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

चऱ्होली चौकात किरकोळ वाहन अपघाताच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५९ वर्षीय व्यक्तीवर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश तांबे हे शुक्रवारी सकाळी चऱ्होली चौकातील सिग्नलवर वाहन उजवीकडे वळवत असताना आरोपी निखील काळे याच्यासोबत किरकोळ धडक झाली. या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपीने फिर्यादीची कॉलर पकडून रस्त्यावरील दगड डोक्यात मारला. तसेच तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना तीन टाके पडले आहेत.

हल्ल्यादरम्यान फेकलेला दगड तेथून जात असलेल्या एका रिक्षाला लागल्याने रिक्षेची समोरील काच फुटून नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिघी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!