प्रतिनिधी : युनूस खतीब
पुणे : दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुळी गावातील बागडे वस्ती परिसरात बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) येथील देवांश हॉटेलच्या पाठीमागील भागात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी संतोष हरिदास शिंगटे (वय ३१, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) याच्या ताब्यातून सुमारे ६,२८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल श्रीकांत वेताळ (बक्कल क्र. २१०८), गुन्हे शाखा युनिट-४ यांनी फिर्याद दिली आहे. कारवाईत पोलीस हवालदार गाडीलकर (बक्कल क्र. १३९९) यांनी सहभाग घेतला.
पोलिसांकडून बेकायदा मद्यविक्रीविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


