spot_img
spot_img
spot_img
spot_img

किराणा दुकानात देशी-विदेशी दारूची अवैध विक्री; चिखली पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोरेवस्ती येथील एका किराणा दुकानात देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा प्रकार चिखली पोलिसांच्या कारवाईत उघड झाला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमशक्ती नगर झोपडपट्टी परिसरातील पल्लवी किराणा स्टोअर्स येथे छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान सिध्देश्वर किसन कोकाटे (वय ५३) याच्या ताब्यातून ५ हजार ८८० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. संबंधित दारूसाठा कोणताही परवाना नसताना विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीदरम्यान हा दारूसाठा आशिष ज्ञानेश्वर गवळी याने विक्रीसाठी पुरविल्याचे समोर आले. त्याच्या सांगण्यानुसार दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

चिखली पोलिसांच्या या कारवाईमुळे मोरेवस्ती परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!