spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, २५१ सिलेंडर ताब्यात

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरातील अवैध गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत २५१ गॅस सिलेंडर, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि एक बोलेरो टेम्पोसह तब्बल ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चाकण मार्केट यार्डजवळील एका गॅस एजन्सीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून विक्री केली जात होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून प्रकाश जवळागी (वय ३२) व तुषार वारुळे (वय ३६) या दोघांना ताब्यात घेतले.

तपासात हे दोघे एजन्सी मालक शुभम प्रवीण परदेशी याच्या सांगण्यावरून हा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता ज्वालाग्राही गॅसची हाताळणी करून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी चाकण (वाकण उत्तर) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार मुख्य आरोपी शुभम परदेशीचा शोध सुरू आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!