spot_img
spot_img
spot_img

शेअर बाजारात IPO ची रेलचेल; या आठवड्यात ‘SME’ मंचावर 3 नवीन इश्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई : भारतीय शेअर बाजारात नवीन आठवड्याची सुरुवात होत असताना प्राथमिक बाजारपेठेत पुन्हा एकदा हालचाल वाढताना दिसत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी असलेल्या ‘SME’ मंचावर तीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यामध्ये एसएमआर ज्वेल्स, राजनंदिनी फॅशन इंडिया आणि याश्वी ज्वेलर्स या कंपन्यांचा समावेश असून, या तिन्ही कंपन्या मिळून बाजारातून १२९ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारणार आहेत.

या आठवड्यात सुरू होणाऱ्या आयपीओंपैकी Yashvi Jewellers चा IPO सर्वप्रथम गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. दागिने आणि ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीचा IPO ‘फिक्स प्राईस’ स्वरूपाचा आहे.

कंपनीचा IPO २५ मे २०२६ ते २७ मे २०२६ या कालावधीत खुला राहणार आहे. प्रति शेअर किंमत ८३ रुपये निश्चित करण्यात आली असून, या इश्यूद्वारे कंपनी ४३.८८ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असणार आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान १ लॉट म्हणजेच ३,२०० शेअर्ससाठी अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी किमान २,६५,६०० रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. IPO चे अलॉटमेंट २९ मे २०२६ रोजी होण्याची शक्यता असून, कंपनीचे शेअर्स २ जून २०२६ रोजी ‘BSE SME’ मंचावर सूचिबद्ध होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, SME सेगमेंटमधील IPO ना अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या आठवड्यातील इश्यूंकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!