spot_img
spot_img
spot_img

वासुली फाट्यावर किरकोळ कारणातून तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण; बरगडी फ्रॅक्चर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वासुली फाटा परिसरात “गाडी अंगावर आली” या संशयातून तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची बरगडी फ्रॅक्चर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज विजय कुमार (वय ३४) हे मित्र ओम महाडीक यांच्यासोबत वासुली फाटा परिसरात भाजी खरेदीसाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी अमोल राऊत याला दुचाकी अंगावर घातल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने भाऊ योगेश राऊत व वडील एकनाथ राऊत यांना बोलावून घेत फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी योगेश राऊत याने लाकडी दांडक्याने पंकज यांच्या हातावर व पायावर वार केले, तर अमोल राऊत याने बरगडीवर जोरदार बुक्क्यांचा मार देत गंभीर जखमी केले. मारहाणीनंतर “पुन्हा आमच्या नादी लागू नको, नाहीतर खल्लास करू,” अशी धमकीही देण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी जाधव करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!