spot_img
spot_img
spot_img

“उष्णतेचा इशारा! पुढील 5 दिवस महाराष्ट्रात तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता”

नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळावे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी राज्यातील नागरिकांना पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विशेषतः मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे जाणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सकाळी 12 नंतर अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच उष्माघाताचा धोका लक्षात घेता भरपूर पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि थेट उन्हात जाणे टाळणे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!