spot_img
spot_img
spot_img

चुकीच्या दिशेने आलेल्या रिक्षावरून वाद; लोखंडी टामीने हल्ला, तरुण जखमी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पुनावळे परिसरात वाहतूक नियमांवरून झालेला वाद हिंसक वळणावर जात लोखंडी टामीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला सात टाके पडले आहेत. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १११/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल समोर घडली. फिर्यादी प्रविण प्रकाश कुंभार (वय ३४, व्यवसाय रिअल इस्टेट कन्सल्टंट, रा. पुनावळे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

तपशीलानुसार, एक रिक्षाचालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत येत होता. याबाबत विचारणा केली असता आरोपीने उद्धटपणे वर्तन करत फिर्यादीला कारमधून खाली उतरवले. त्यानंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपी संतोष अशोक भोसले (वय २७, रा. जांभे) याने आपल्या रिक्षामधील लोखंडी टामी आणि जॅक बाहेर काढून फिर्यादीवर हल्ला केला. लोखंडी टामीने डाव्या हाताच्या तळहातावर जोरदार प्रहार केल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला सात टाके पडले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२)(३) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!