spot_img
spot_img
spot_img

दापोडीत हातभट्टी दारूवर कारवाई ; १०० लिटर साठा जप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

दापोडी परिसरात अवैधरीत्या हातभट्टीची दारू साठवून विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास विश्वासचाळ परिसरात, पवार यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

या कारवाईत नारायण दुर्गा साळवी (वय ४९, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) याच्याकडून सुमारे १०,००० रुपये किंमतीची १०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. आरोपी हा बेकायदेशीररित्या कोणताही परवाना नसताना दारू साठवून विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीस नोटीस बजावण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस अधिकारी शेळके करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!