spot_img
spot_img
spot_img

आयसीयूमध्ये धक्कादायक प्रकार! दरवाज्याची काच फोडून वृद्ध महिलेला जखमी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून, रागाच्या भरात दरवाज्याची काच फोडून एका वृद्ध महिलेला जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) व ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१० वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु वॉर्डमध्ये घडली. फिर्यादी कांता मारुती जाधव (वय ६९, रा. ताथवडे) या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत्या.

त्यावेळी शेजारील बेडवरील रुग्ण बाबासाहेब शंकर डोंगरे (वय ४२, रा. औंधगाव) याने आयसीयु वॉर्डचा दरवाजा बंद केल्याच्या कारणावरून संताप व्यक्त करत दरवाज्याची काच फोडली. त्यानंतर तुटलेल्या काचेचा वापर करून जाधव यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ वार करून त्यांना जखमी केले.

या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी महिलेला तातडीने उपचार देण्यात आले.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!