spot_img
spot_img
spot_img

कै. मनोहर दत्तात्रय वाढोकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कै. मनोहर दत्तात्रय वाढोकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वाढोकार उद्योग समूहाद्वारे केले जाते. यावर्षीही त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त या रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन रोटरी क्लब, संभाजीनगर, चिंचवड. थरमेक्स चौकाजवळ केले गेले.
या रक्तदान शिबिरात वाढोकार उद्योग समूहातील कर्मचारी, अधिकारी, सप्लायर्स , ग्राहक तसेच सर्व हितचिंतक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. रक्तदान शिबिराला यावर्षी १६ वर्षे पूर्ण होत असून सातत्याने रक्तदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे आणि यावर्षीही शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून १००२ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली ज्यात महिला रक्तदात्यांची संख्या हि लक्षणीय होती. यावर्षी वाढोकर ग्रुप मधील पंतनगर, धारवाड, छत्रपती संभाजी नगर,अकोला या ठिकाणी ही हे शिबीर घेण्यात आले व एकूण रक्तदात्यांची संख्या १४६८ इतकी झाली. कै. मनोहर दत्तात्रय वाढोकार यांना आदरांजली देण्याचा हा अभिनव मार्ग असून या उपक्रमाला आता समाजात आदराचे स्थान प्राप्त होऊ लागले आहे.
या शिबिरास पुण्यातील नामांकित रक्त पेढ्या सहभागी झाल्या ज्यामध्ये Y.C.M Blood Bank, औंध ब्लड बँक, पिंपरी सेरोलोजीकल, ससून ब्लड बँक, AFMC आर्मी ब्लड बँक आणि डी.वाय.पाटील ब्लड बँक यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात कै. मनोहर वाढोकार व कै. दत्तात्रय वाढोकार यांच्या प्रतिमा पूजनाने व पसायदानाने झाली. यावेळी समाजातील नामवंत मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमातील दीप प्रज्वलन वाढोकर कुटुंबातील बाळ-गोपाळ यांच्या हस्ते झाले व मान्यवरांसह सर्व वाढोकार कुटुंबीयांनी प्रतिमेचे पूजन केले.
वाय सी एम हॉस्पिटल व कॉलेज चे डीन डॉक्टर राजेंद्र वाबळे तसेच मुख्य आरोग्य अधिकारी यांनी शिबिराला भेट दिली आणि त्यांनी या भव्य शिबिराच्या आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने रक्तदान करायला आलेल्या उपस्थित रक्तदात्यांचे कौतुक केले. एक हजाराहून अधिक राक्तदात्यांचे हे शिबीर म्हणजे सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे व प्रेरणेचे स्थान आहे असेही त्यांनी नमूद केले.
शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले व प्रत्येकाला स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री अखिल त्रिपाठी यांनी केले व यानिमित्ताने कै. मनोहर दत्तात्रय वाढोकार यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला.
वाढोकार ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे आयोजित हे सामाजिक उपक्रम खरोखर प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. प्रत्येक वर्षी या शिबिराचे आयोजन जास्त भव्य स्वरुपात करण्याचे या ग्रुपचे मानस आहे व त्या संकल्पात ते यशस्वी होतील याची त्यांना खात्री आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!