शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आणि महिला दिनानिमित्त भव्य ‘नारीशक्ती गुणगौरव सोहळा’, चार पुस्तकांचे प्रकाशन आणि खुले काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. श्रीपाल सबनीस व मा. ललिताताई सबनीस यांनी भूषवले.
या प्रसंगी बोलताना डॉ. सबनीस यांनी “समाजाने बुवाबाजीपासून सावध राहून जागृत होणे गरजेचे आहे,” असा संदेश देत समाजजागृती केली. तसेच सर्व पुरस्कार विजेत्या महिलांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ललिताताई सबनीस यांनी साहित्यिकांना शुभेच्छा देत “लेखणी अधिक धारदार ठेवा,” असा मोलाचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उद्घाटक प्रा. पांडुरंग भोसले, स्वागताध्यक्ष डॉ. शैलेंद्र भणगे, तसेच पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. संभाजी मलघे, लक्ष्मण शिंदे, महादेव रोकडे, रज्जाक शेख, डॉ. मिलिंद चौधरी, अंजना धायगुडे, सीताराम नरके, व्यंकटराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका शैलेजाताई मोरे आणि जागतिक आरोग्य सल्लागार सोनल जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘अहिल्यादेवी होळकर-हिरकणी गौरव पुरस्कार २०२६’ विविध क्षेत्रातील महिलांना प्रदान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर -हिरकणी गौरव पुरस्कार,२०२६ ने साहित्य: सौ.कविता बाळू काळे,शिक्षिका: सौ.सारिका गजराज आस्मर,सेविका ~ सौ.शरणव्वा नितीन बनसोडे,परिचारिका:कल्पना रविंद्र यादव,सामाजिक कार्यकर्ते:उषा मिलिंद भोसले,पत्रकारिता: कु.गजाला रफिक सय्यद,डॉक्टर : डॉ.प्राजक्ता महाजन,रक्तदाता:श्रीमती अंजू सोनवणे यांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रतिमा काळे यांचा ‘काळजातली साद’, ‘चारोळी संग्रह’, ‘जागर स्त्री शक्तीचा’ तसेच धनंजय इंगळे यांचा ‘भावगंध’ आणि ‘काव्यसरिता’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात भव्य काव्यसंमेलन पार पडले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ६० कवींनी आपल्या काव्यरचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या सत्राचे अध्यक्ष मा. म. भा. चव्हाण होते.
या भव्य सोहळ्याचे आयोजन प्रतिमा काळे व धनंजय इंगळे यांनी केले असून संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन अंजना धायगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. दिनेश भोसले आणि सौ. राजश्री मराठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिमा काळे यांनी मानले.



