spot_img
spot_img
spot_img

२४ तासांत घरफोडी-वाहनचोरीचा गुन्हा उघड; वाकड पोलिसांची दमदार कामगिरी

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चैनिसाठी घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अवघ्या २४ तासांत अटक करत वाकड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४६/२०२६ अंतर्गत दाखल घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. ताथवडे परिसरातील डेअरी फार्मजवळ संशयित हालचाली आढळून आल्यानंतर आदिल नुमान खान (वय २७, रा. नायगाव, मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले.

सखोल चौकशीत आरोपीने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली असून वाकडसह शिरवळ (सातारा) आणि मुंबईतील विविध भागात घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपीला २४ मार्च रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी दोन मोपेड दुचाकी, तीन मोबाईल फोन, मॅकबुक, एअरपोड, चार्जर, डिजिटल गेमिंग प्लेस्टेशन, कंट्रोलर व अॅडॉप्टर असा एकूण २.६७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त बसवराज तेली व सारंग आव्हाड, तसेच उपायुक्त विशाल गायकवाड व सहायक आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग व त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, आरोपीने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व इतर भागात आणखी गुन्हे केल्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!