spot_img
spot_img
spot_img

रामनवमी निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल; प्रमुख मार्गांवर बंदी, पर्यायी मार्ग जाहीर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

रामनवमी उत्सवानिमित्त दिनांक २६ मार्च २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार असल्याने शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी तात्पुरती वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

सदर दिवशी सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत (किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत) काही प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने व मिरवणुकीतील वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.

भोसरी वाहतूक विभाग

हरिओम स्वीट चौक ते भोसरी ओव्हर ब्रिज मार्ग बंद
पर्यायी मार्ग : विदर्भ मित्र मंडळ – आळंदी रोड

दिघी चौक ते दिघी रोड मार्ग बंद
पर्यायी मार्ग : पीएमटी चौक – आळंदी रोड

चिखली वाहतूक विभाग

पुणे-नाशिक महामार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक (मोशी) येथे प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : भारतमाता चौक

कुदळवस्ती (चाय पॉईंट) ते मोशी मार्ग बंद
पर्यायी मार्ग : भारतमाता चौक

चाकण वाहतूक विभाग

चाकण चौक ते महात्मा फुले व नेहरू चौक मार्ग बंद
पर्यायी मार्ग : माणिक चौक – मेदनकरवाडी / तळेगाव चौक – आंबेठाण चौक

आंबेठाण चौक ते महात्मा फुले चौक मार्ग बंद
पर्यायी मार्ग : मेदनकरवाडी – शिक्रापूर रोड

मार्केट यार्ड ते नेहरू चौक मार्ग बंद
पर्यायी मार्ग : आंबेठाण चौक – चाकण चौक

नेहरू चौक ते शनि मंदिर रोड मार्ग बंद

पर्यायी मार्ग : आंबेठाण चौक / बीड वस्ती – खंडोबा माळ – मेदनकरवाडी

पोलिसांचे आवाहन

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असताना शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!