spot_img
spot_img
spot_img

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे पुणे विमानतळावर स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज पुणे विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उपराष्ट्रपती महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

यावेळी राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंग, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!