spot_img
spot_img
spot_img

कुणाल आयकॉन रोडचे काम वेळेत पूर्ण करा; अधिकाऱ्यांना नाना काटे यांचे निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडच्या सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आज महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी कामाचा दर्जा, गती आणि नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान कुणाल आयकॉन, शुभश्री, साई अवेन्यू आदी सोसायट्यांच्या गेटसमोर पावसाळ्यात पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी चेंबर तयार करून त्याचे कनेक्शन स्ट्रॉम वॉटर लाईनला जोडण्याच्या तसेच साचलेल्या पाण्याचा सुरळीत निचरा करण्याच्या सूचना काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत मोरे, विद्युत विभागाच्या डेप्युटी इंजिनिअर दिपाली रेडे, स्थापत्य विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विवेक गजपुरे, पाणीपुरवठा विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर अंकुश सयाजीराव, तसेच इन्फ्राकिंग कन्सल्टन्सी इंजिनियर्स प्रा. लि. चे प्रकल्प सल्लागार आर. ई. राकेश पटेल आणि टी अँड टी इन्फ्रा लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर युवराज आवारे आदी उपस्थित होते.

सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी उच्च दर्जात व वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करत काटे यांनी कामाची गती वाढविण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कामादरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या पाहणीदरम्यान परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची दखल घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

कुणाल आयकॉन रोडचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!