spot_img
spot_img
spot_img

रविदादा भिलारे सोशल फाउंडेशनचा उपक्रम; १३५ जणांनी केले रक्तदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त रविदादा भिलारे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १३५ शिवशंभू भक्तांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

कार्यक्रमाची सुरुवात नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाराजांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिरात युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. प्रत्येक रक्तदान दात्यास बॅग भेट म्हणून देण्यात आली.  समाजात रक्ताची गरज लक्षात घेता अशा उपक्रमांमुळे अनेक रुग्णांना मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी युवा नेते रवी भिलारे, नम्रता भिलारे, सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, रितू कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी योगदान देणे हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्य व सेवाभावाचा संदेश देण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!