spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहरातील नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी, तसेच विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) चे अधिकारी व महापौर रवि लांडगे यांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यवसायिक संचालक शंकर करजगी, भाग्यश्री मंथलकर उपस्थित होते.

बैठकीत शहरात एमएनजीएल मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी महापालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या लवकरात लवकर कशा देता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीनंतर एमएनजीएलच्या शिष्टमंडळासह महापौर रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एमएनजीएलच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांबाबत तातडीने कार्यवाही करून परवानगी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!